मुक्तस्पर्श............
तो स्पर्श सांग तुजला सांगुन काय गेला
गालावरी तुझ्या का खुलवुन लाज गेला
बेहोश रम्य राती उधळून श्वास गेला
गालावरी तुझ्या का खुलवून लाज गेला..
गालावरी तुझ्या का खुलवुन लाज गेला
होता जरा शहारा, वेडा खुला बहानासंगीत शांत केले अंधार गात गेला
ओठांवरी तुझ्या का, चढवुन साज गेला
बेहोश रम्य राती उधळून श्वास गेला
भिजवुन अंग सारे विझवुन शब्द सारेतो स्पर्श सांग तुजला सांगुन काय गेला
रंगात आज तुजला, रंगुन भास गेला...
गालावरी तुझ्या का खुलवून लाज गेला..
तो स्पर्श सांग तुजला सांगुन काय गेला......................................राहुल राजेंद्र वाकलकर.
गालावरी तुझ्या का खुलवुन लाज गेला
No comments:
Post a Comment