Saturday 24 March 2012

आमची मुंबई................

मुंबईचे वर्णन...........

कायहो मुंबई बंदर उमदा कोठ्यावधि फिरतात जहाजे ॥
अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे ॥
गव्हर्नराचे तक्त मजेचे दिसते उमदा खूब शिरा॥
तऱ्हेतऱ्हेचे रंगित बंगले ऐन इंग्रजी पहा तऱ्हा॥
भर रस्त्यामध्ये उभे शिपाई लोक म्हणती सरा सरा॥
रथगाड्यांची गर्दी होती व्हा बाजूला मागें फिरा॥
मोठे मोठे सावकारसाहेब रथ फिरवीती झरा झरा ॥
नव खंडीचे माणुस पाहुन रथ म्हणती हा बरा बरा ॥
जिकडे तिकडे अशीच गर्दी रथ जाता घडघड वाजे ॥
अज कंपनी शहर त्याजला लंकेची उपमा साजे ॥
                                                                      

मुक्तस्पर्श......

मुक्तस्पर्श............


स्पर्श | Marathi Kavita
तो स्पर्श सांग तुजला सांगुन काय गेला
गालावरी तुझ्या का खुलवुन लाज गेला
होता जरा शहारा, वेडा खुला बहाना
ओठांवरी तुझ्या का, चढवुन साज गेला
संगीत शांत केले अंधार गात गेला
बेहोश रम्य राती उधळून श्‍वास गेला
भिजवुन अंग सारे विझवुन शब्द सारे
रंगात आज तुजला, रंगुन भास गेला...
तो स्पर्श सांग तुजला सांगुन काय गेला
गालावरी तुझ्या का खुलवून लाज गेला..
तो स्पर्श सांग तुजला सांगुन काय गेला
गालावरी तुझ्या का खुलवुन लाज गेला
                                                    ......................................राहुल राजेंद्र वाकलकर.

मराठी अस्मिता...................

लता मंगेशकर

Lata Mangeshkar

लता मंगेशकर | Lata Mangeshkar
पिताश्री दीनानाथ मंगेशकर यांच्या कडून तसेचआईच्या आईची आई यांच्या कडून जाणते. अजाणतेपणी संगीतांचे मिळालेले शिक्षण आणि संगीतमय कुटुंबात जन्म घेतल्यामुळे असेल अगर दैवीशक्ती मुळे जन्मतः च लाभलेला सुरेल आवाज, संगीत-मय वातावरणात, बालवयात झालेले संस्कार हेच कारन असेल कि आज लता मंगेशकर नावाचे स्वर आपल्याला संगीत जगतात ऐकवितात.
वैभवात जन्मलेल्या लता, मिना, उषा, आशा, हृदयनाथ या भावडांना वडिलांच्या मृत्यूनंतर फार हालाखीचे जीवन जगावे लागले. ‘प्रफुल्ल पिक्चर्स’ मध्ये फक्त ८० रु. पगारावर लता दिदींनी काम केले ते फार बालवयात. पुणे ते कोल्हापूर ते मुंबई हा त्यांचा प्रवास फार उंच खडतर वाटेवरचा होता. त्यात त्यांना फार मोठमोठ्या व्यक्तीचा सहवास लाभला असला तरी कित्येक कटू प्रसंगांनाही तोंड द्यावे लागले.
साध्या शांपूवरुन, "त्यांनी कधी अशी किंमती वस्तू बघितली तरी होती का?" असे ऐकावे लागले होते. तुंटपुज्या पगारामुळे त्यांना त्यांच्या लाडक्या भावाच्या हृदयानाथांच्या मांडीवरच्या जखमेवर उपचार सुद्धा करता येत नव्हता पण त्याही परिस्थितीत घाबरुन न जाता त्या मोठ्या ध्येयांने सामोऱ्या जात होत्या. लहानपणी बक्षिसरुपात मिळालेला दिलरुबा तुटला तेव्हा लतादिदी रडू लागल्या त्यावर पंडित दिनानाथांनी त्यांना उपदेश केला कि ‘यश’ असे डोक्यात जाऊ देऊ नये. आणी त्यांनी शेवटपर्यंत ते पाळले. म्हणूनच त्य फक्त गायिकाच राहील्या नाही तर त्यांनी ‘आनंदधन’ या नावाने संगीत रसिकांना अनेक संगीत अविष्काराची दालने उघडून दिली. त्यांच्या मातोश्री स्वतः चित्रकाअ होत्या. आणि त्या स्वतःचे चित्र-अविष्कार लोकांना भेट म्हणून देत असत.
लतादिदिंनी अखंड परिश्रमाने स्वतःच्या कुटुंबाचे नंदनवन केले. आज त्यांच्या याच कष्टाचे फळ म्हणजे संगीत क्षेत्रात सर्वात पहिला मान मिळातो तो मंगेशकर भावडांना. संगीत-कला अविष्कार महान कुटुंब म्हणून त्यांची जी ख्याती आहे त्या मागे ५० वर्षांहून अधिक काळाचा प्रदिर्घ कष्टमय इतिहास आहे. आणि त्याच इतिहासाचे चालते बोलते प्रतिक आहे,"गानकोकिळा, संगीत सम्राज्ञी लता मंगेशकर.

जय हिंद !


आज २३ मार्च
या भारतमातेचे तीन थोर सुपुत्र, महान क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी आजच्या ८१ वर्षापूर्वी आपल्या या भारतमातेला  परकियांच्या ताब्यातून सोडविण्यासाठी बलिदान दिले. हसत हसत फासावार गेले. आणि त्यांनी दिलेल्या बलिदानामुळे आज आपण स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत. या महान वीरांना आमचा सलाम!

"
शहीदो कि चिताओ पार लगेंगे हर बरस मेले
वतन पर मिटणे वालो का याही बाकी निशाण होंग"

जय हिंद!
भगतसिंग,राजगुरू ,सुखदेव अमर रहे.........................