Saturday, 24 March 2012

मराठी अस्मिता...................

लता मंगेशकर

Lata Mangeshkar

लता मंगेशकर | Lata Mangeshkar
पिताश्री दीनानाथ मंगेशकर यांच्या कडून तसेचआईच्या आईची आई यांच्या कडून जाणते. अजाणतेपणी संगीतांचे मिळालेले शिक्षण आणि संगीतमय कुटुंबात जन्म घेतल्यामुळे असेल अगर दैवीशक्ती मुळे जन्मतः च लाभलेला सुरेल आवाज, संगीत-मय वातावरणात, बालवयात झालेले संस्कार हेच कारन असेल कि आज लता मंगेशकर नावाचे स्वर आपल्याला संगीत जगतात ऐकवितात.
वैभवात जन्मलेल्या लता, मिना, उषा, आशा, हृदयनाथ या भावडांना वडिलांच्या मृत्यूनंतर फार हालाखीचे जीवन जगावे लागले. ‘प्रफुल्ल पिक्चर्स’ मध्ये फक्त ८० रु. पगारावर लता दिदींनी काम केले ते फार बालवयात. पुणे ते कोल्हापूर ते मुंबई हा त्यांचा प्रवास फार उंच खडतर वाटेवरचा होता. त्यात त्यांना फार मोठमोठ्या व्यक्तीचा सहवास लाभला असला तरी कित्येक कटू प्रसंगांनाही तोंड द्यावे लागले.
साध्या शांपूवरुन, "त्यांनी कधी अशी किंमती वस्तू बघितली तरी होती का?" असे ऐकावे लागले होते. तुंटपुज्या पगारामुळे त्यांना त्यांच्या लाडक्या भावाच्या हृदयानाथांच्या मांडीवरच्या जखमेवर उपचार सुद्धा करता येत नव्हता पण त्याही परिस्थितीत घाबरुन न जाता त्या मोठ्या ध्येयांने सामोऱ्या जात होत्या. लहानपणी बक्षिसरुपात मिळालेला दिलरुबा तुटला तेव्हा लतादिदी रडू लागल्या त्यावर पंडित दिनानाथांनी त्यांना उपदेश केला कि ‘यश’ असे डोक्यात जाऊ देऊ नये. आणी त्यांनी शेवटपर्यंत ते पाळले. म्हणूनच त्य फक्त गायिकाच राहील्या नाही तर त्यांनी ‘आनंदधन’ या नावाने संगीत रसिकांना अनेक संगीत अविष्काराची दालने उघडून दिली. त्यांच्या मातोश्री स्वतः चित्रकाअ होत्या. आणि त्या स्वतःचे चित्र-अविष्कार लोकांना भेट म्हणून देत असत.
लतादिदिंनी अखंड परिश्रमाने स्वतःच्या कुटुंबाचे नंदनवन केले. आज त्यांच्या याच कष्टाचे फळ म्हणजे संगीत क्षेत्रात सर्वात पहिला मान मिळातो तो मंगेशकर भावडांना. संगीत-कला अविष्कार महान कुटुंब म्हणून त्यांची जी ख्याती आहे त्या मागे ५० वर्षांहून अधिक काळाचा प्रदिर्घ कष्टमय इतिहास आहे. आणि त्याच इतिहासाचे चालते बोलते प्रतिक आहे,"गानकोकिळा, संगीत सम्राज्ञी लता मंगेशकर.

No comments:

Post a Comment